Take a fresh look at your lifestyle.

10 हजारांहून अधिक फ्रेशर्सना नोकरी; HCLTech देणार पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी

HCL Mega Recruitment 2024

0 367

HCL Mega Recruitment 2024

HCL Mega Recruitment 2024

खुशखबर !! HCL मध्ये होणार मोठ्या संख्येने भरती….. मोठ्या आयटी कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी कमी होऊ लागल्या आहेत. मार्च तिमाहीत जवळपास सर्व मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र मार्च तिमाहीत HCL टेकच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2,725 ने वाढली आहे.

देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीनंतर 2 लाख 27 हजार 481 झाली आहे. यापूर्वी, 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीनंतर, एचसीएल टेकच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 24 हजार 756 होती.

कंपनीने गेल्या वर्षीप्रमाणेच 2024-24 या आर्थिक वर्षात 10,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती करणार असल्याचे जाहीर केले. कंपनीच्या या घोषणेमुळे तरुणांमध्ये उत्साह वाढला आहे. यातच आता आयटी कंपनी एचसीएल टेक तरुणांना मोठी संधी देणार आहे. देशातील सर्वात मोठ्या पाच आयटी कंपन्यांमध्ये, एचसीएल टेक वगळता, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे.  संपूर्ण उद्योगात नोकऱ्या कमी होत असताना तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. सर्वात मोठी IT कंपनी TCS असो किंवा विप्रो असो, कर्मचाऱ्यांची संख्या अलीकडच्या काही महिन्यांत कमी झाली आहे.

IT क्षेत्रातील सर्वात मोठी आणि देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी TCS ने मार्च तिमाहीत 1,759 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, तर TCS कर्मचाऱ्यांची संख्या संपूर्ण आर्थिक वर्षात 13 हजार 249 ने कमी झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षातही आयटी कंपन्यांना कमकुवत मागणीचा सामना करावा लागला. येत्या वर्षासाठी कंपन्यांचे अंदाजही चांगले नाहीत. इन्फोसिसचा असा विश्वास आहे की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या चालू आर्थिक वर्षात त्यांच्या महसुलात 1 ते 3 टक्क्यांनी किरकोळ वाढ होऊ शकते. जून तिमाहीत विप्रोच्या महसुलात 1.5 टक्के घट होण्याची अपेक्षा आहे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा