Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर – ग्रामसडक योजनेसाठी दीड हजार पदांची भरती

Gram Vikas Vibhag Bharti 2021

0 632
Gram Vikas Vibhag Bharti 2021 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्यात मरगळ आली आहे. दोन वर्षांपासून नवे कोणतेही प्रस्ताव नाहीत, कंत्राटदरांची शेकडो कोटींची देयके थकीत आहेत. त्यानंतरही एका विशिष्ट एजन्सीमार्फत अभियंते व कर्मचाऱ्यांची आउट सोर्सिंगद्वारे तब्बल दीड हजार पदांची भरती करण्यात आली आहे.
विशेष असे, राज्याचे ग्रामविकास मंत्रालय आणि दिल्ली कनेक्शनमधून या नोकरभरतीचे कंत्राट CSC या कंपनीला देण्यात आले असून याच कंपनीमार्फत कर्मचारी नेमले जावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्थायी अभियंत्यांवर दबावही निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत यापूर्वीही विविध संस्थांमार्फत आउट सोर्सिंगद्वारे कर्मचारी भरती केली गेली. परंतु आता CSC या ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीमार्फतच कर्मचारी नेमण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी दिल्लीतून राज्यात दबाव वाढविला जात आहे.