Take a fresh look at your lifestyle.

संरक्षण कोटय़ातून इंजिनीअरिंगच्या 4,100 जागा आरक्षित

Engineering Admission

0 89

Engineering Admission  2021 : 4,100 engineering seats reserved from defense quota – संरक्षण कोटय़ा अंतर्गत अॅडमिशन न मिळाल्याने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्रात 4 हजार 100 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून संरक्षण कोटय़ा अंतर्गत केवळ एक हजार 45 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

इंजिनीअरिंगच्या प्रथम व द्वितीय वर्षासाठी 5 टक्के संरक्षण कोटय़ाअंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी इंडियन एक्स सर्व्हिस लीग मुंबईचे अध्यक्ष सुजित आपटे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने इंजिनीअरिंगच्या विविध कोर्सेसकरिता 5 टक्के संरक्षण कोटय़ाअंतर्गत जागा मिळत नसल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर राज्य सरकारच्या वतीने अॅड. बी.व्ही. सामंत यांनी बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, विविध जिल्ह्यांत आवश्यक तेवढय़ा जागा संरक्षण कोटय़ाअंतर्गत आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या जागांच्या तुलनेने या कोटय़ातून अॅड. मिशन घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या विविध कोर्सेससाठी 1 लाख 23 हजार 895 जागा असून डिफेन्स कोटय़ाअंतर्गत 4 हजार 100 जागा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.