Take a fresh look at your lifestyle.

आरक्षण बदलल्याने शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर!

Shikshak Bharti Details

0 94

Shikshak Bharti 2021

Shikshak Bharti Details: Shikshak Bharti 2021 – Teacher recruitment postponed again due to change in reservation! Fear of delaying the recruitment process as it will take a long time – अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी राज्यभरातील शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे

Teacher Bharti 2021 – १४ ऐवजी २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; आणखी मुदतवाढीची शक्यता

शैक्षणिक संस्थांतील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी, या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली होती. या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला सुरवातीपासूनच घरघर लागली. मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील पाच हजार ८०० जागा भरल्या असल्या, तरी उर्वरित सहा हजार जागा अजून भरणे बाकी आहे. यामध्ये खासगी शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने २३ डिसेंबर २०२० मधील तरतुदीनुसार लॉगिन करून १४ जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. दरम्यान, २५ जानेवारीला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात पुन्हा बदल झाला, तर आरक्षणाचा बदल पुन्हा उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही

राज्यात सात लाख उमेदवारांचा प्रश्न कायम

राज्यात २०१० नंतर शिक्षक भरती प्रक्रियेस प्रतिबंध करण्यात आला होता. माध्यमिक स्तरावरही इंग्रजी- विज्ञान विषय वगळता नियुक्ती न देण्याचे आदेश शासनाने यापूर्वी दिले होते. त्यामुळे २०१० नंतर राज्यात सुमारे सात लाखांहून अधिक उमेदवार डी.एड. बी.एड. पात्रताधारक ठरले आहेत. या उमेदवारांनी पात्रता धारण केली असली तरी त्यांना नियुक्ती मात्र मिळू शकलेली नाही. त्यामुळे अनेकांनी या कालावधीत स्पर्धा परीक्षेचे माध्यम निवडून विविध विभागांत सेवा करणे पसंत केले.