Take a fresh look at your lifestyle.

MPSC 2021 – MPSC आगामी मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन

MPSC Online Examinations

0 188

खुशखबर – MPSC जुलै- ऑगस्टमध्ये होणारी ‘ही’ मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन 

MPSC Bharti 2021 : MPSC Online Examination 2021 – The commission has decided to conduct the upcoming main exam online. The first experiment will be conducted through the Engineering Service Examination to be held in July-August. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजनानुसार आता 14 मार्च, 27 मार्च आणि 11 एप्रिलला राज्य सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, आता निकाल वेळेत लागावा, एका वर्षात दोनदा परीक्षा घेता यावी म्हणून आयोगाने आगामी मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्‍चित केले आहे. जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून पहिला प्रयोग केला जाणार आहे.

मेगा भरती आणि MPSC 2021-22 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच 

30 हजार पदे रिक्‍त, तरीही मागणीपत्रे नाहीत

राज्यातील सुमारे 28 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून सप्टेंबरपासून त्यांच्याकडील रिक्‍त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिली जाते. त्यानुसार आयोगाकडून परीक्षांचे नियोजन होते. राज्यातील विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त असून त्यात प्रथम व द्वितीय श्रेणीतील 30 हजारांहून अधिक पदे आहेत. मात्र, यंदा कोणत्याही विभागाने आयोगाला मागणीपत्र दिले नसल्याने या वर्षातील परीक्षा पुन्हा विलंबानेच होतील. आयोकडून मागणीपत्रासाठी पाठपुरावा सुरु आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी आणि मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयातून मिळालेली स्थगिती, यामुळे राज्य सरकारने रिक्‍त पदांची मागणीपत्रे दिली नसल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘एमपीएससी’तर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा पूर्व परीक्षा, कृषी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहायक, दुय्यम निरीक्षक (संयुक्‍त सेवा परीक्षा, गट- क) अशा परीक्षा घेतल्या जातात. राज्यभरातील सुमारे 30 लाखांपर्यंत विद्यार्थी या परीक्षा देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना आयोगाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, त्याची तपासणी आणि निकालासाठी दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतो. पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑफलाइन होत असल्याने परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालासाठी चार- सहा महिन्यांचा कालावधी जातो. या काळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येते. आता आयोगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहावेळाच परीक्षा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. सुरवातीला कमी उमेदवार असलेल्या परीक्षेत हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करुन आगामी सर्वच मुख्य परीक्षा ऑनलाइन होतील, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.