Take a fresh look at your lifestyle.

पोलिस भरतीसाठी १७.७६ लाख अर्जांचा ढीग; जूनपासून मैदानी चाचणी!

Maharashtra Police Recruitment 2024

0 1

Maharashtra Police Recruitment 2024

Maharashtra Police Recruitment 2024

ज्यभर १७ हजार ४७१ पदे भरण्यासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. या पोलीस भरती २०२४ साठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधर तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. राज्यातील बेरोजगारीची स्थिती मागील काळातील सरकारी विभागांच्या भरतीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदाच्या भरतीत एका जागेसाठी अनुमानित ७८० उमेदवार स्पर्धेत आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ आणि पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार भरतीच्या प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. एकूणच या पोलिस भरतीत एका जागेसाठी १०२ उमेदवारांची परीक्षा होणार आहे.

लोकसभेची आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर, म्हणजेच ४ जूनपासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहेत. उमेदवारांची तीव्रता पाहून, सकाळच्या वेळेत मैदानी चाचणी होणार आहेत. सामान्यत: दिवाळीच्या अगोदर लेखी परीक्षा होऊ शकते. पण, विधानसभेच्या आचारसंहितेच्या कारणाने किंवा कामकाजाच्या कारणाने या परीक्षेला कोणतीही अडचण येणार नाही, असा अनुमान गृह विभागाने ठेवलेला आहे. या संदर्भातील पुढील सर्व माहिती महाभरती वर आम्ही वेळोवेळी प्रकाशित करूच.

 

पोलिस भरतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणत: अडीच ते तीन महिने लागू शकतात. उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एकाचवेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे. मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती. यंदा तशाप्रकारेच घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

पदे अन्‌ उमेदवारांचे अर्ज

  • पदनाम रिक्त पदे अर्ज
  • पोलिस शिपाई ९,५९५ ८.२२ लाख
  • चालक १,६८६ १.९८ लाख
  • पोलिस बॅण्डसमन ४१ ३२,०००
  • एसआरपीएफ ४,३४९ ३.५० लाख
  • तुरुंग शिपाई १,८०० ३.७२ लाख
  • एकूण १७,४७१ १७.७६ लाख

लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर- ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी बहुसंख्य पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सद्य: स्थिती आहे.

 

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा