Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर, राज्यात तब्बल ९ हजार होम गार्ड जवानांची भरती लवकरच

Home Guard Recruitment 2024

0 51

Home Guard Recruitment 2024

Home Guard Recruitment 2024

गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात रिक्त असलेल्या ९ हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी मंगळवारी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त २०० जागा लवकरच भरण्यात येतील, असेही ते म्हणाले.

गृहरक्षक दलाचे नूतन महासमादेशक तथा अप्पर पोलिस महासंचालक रितेशकुमार मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. गृहरक्षक दलाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा गृहरक्षक दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची देसाई यांनी माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना रितेशकुमार म्हणाले, राज्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी; किंबहुना आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दलाचे जवान रात्र दिवस कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने गृह खाते सकारात्मक आहे.
दलातील जवानांच्या गृहरक्षक मानधनवाढीबाबतचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे. सध्या प्रतिदिन ६७० रुपये मानधन मिळते. त्यात कमाल वाढ करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
राज्यात गृहरक्षक दलाची ५५ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील रिक्त ९ हजार पदांच्या भरतीबाबतही शासनस्तरावर लवकर निर्णय अपेक्षित आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही रितेशकुमार यांनी सांगितले.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिलेली आहे 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा