Take a fresh look at your lifestyle.

SSC CHSL Tier 2 परीक्षेची तारीख जाहीर

SSC Exam Dates Updates

0 312

SSC Exam Dates Updates : SSC CHSL Tier 2 Exam: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कंबाइंड हायर सेकेंडरी लेव्हल (CHSL) पदांसाठी टिअर – २ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. SSC CHSL Tier 2 परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. एसएससीमार्फत पुढील आठवड्यात या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांनी SSC CHSL परीक्षेचे अॅडमिट कार्ड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे. जे उमदेवार SSC CHSL Tier 1 परीक्षेत यशस्वी ठरले आहेत, तेच टीअर २ परीक्षेसाठी पात्र आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे की, पात्र उमेदवारांना अॅडमिट कार्ड टीअर २ परीक्षेआधी सात दिवस संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करावे लागेल. उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करताना अडचणी उद्भवल्या तर ते स्थानिक कार्यालयात संपर्स साधू शकतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची पूर्ण जबाबदारी ही उमेदवारांची असेल.’

SSC CHSL टीअर १ परीक्षेचा निकाल १५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. टीअर १ च्या निकालाच्या आधारेच उमेदवारांची टीअर २ परीक्षेसाठी निवड करण्यात आली. स्टाफ सिलेक्शन कमिशन ने टीअर १ परीक्षेची उत्तर तालिका देखील संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. ही आन्सर की २० फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांनी SSC CHSL टीअर १ परीक्षा दिली आहे ते आपले गुणदेखील पाहू शकणार आहेत. आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे गुण उपलब्ध करून दिले आहेत. येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपल्या रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या सहाय्याने आपले गुण पाहता येतील.

Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.