Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश!! Police Patil Bharti 2022

Police Patil Bharti 2022

0 47

Police Patil Bharti 2022 :पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

Rajya Police Patil Bharti 

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले,

  • पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, याबाबत गृह व महसूल विभागाने त्वरीत कार्यवाही करावी.
  • तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रति वर्षी पुरस्कार देण्यात येतात.
  • मागील काही वर्षात सदर पुरस्कार देण्याचे बंद झालेले आहे.
  • हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देशही वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच अतिरिक्त कामकाजासाठी अतिरिक्त भत्ता देण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागास दिले. पोलीस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलीस पाटील भवन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी एक कक्ष निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भवन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविण्यात यावेत. असेही त्यांनी सांगितले.

पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, या प्रमुख मागण्यांवर यावेही सकारात्मक चर्चा झाली.

Police Patil Bharti 2022

गेल्या तीन- चार वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा लवकरच पोलीस पाटील भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 712 जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितले आहे.

गेले चार वर्षांपासून पोलीस पाटीलच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना संकटामुळे यासाठी अधिक विलंब झाला. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, आरक्षण सोडत काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, आतापर्यंत 1130 पदे भरण्यात आली आहेत. आता लवकरच 712 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटील पदाला महत्व आहे. पाच वर्षांसाठी असलेले पोलीस पाटील पदासाठी महसूल विभागाकडून भरती केली जाते आणि पोलीस विभागाकडून संबंधित पोलीस पाटील यांना दर महा 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा