Take a fresh look at your lifestyle.

आता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने

Now Postgraduate Admission

0 114

Now Postgraduate Admission : Now postgraduate admission in college is centralized.  – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने होईल, असा निर्णय विद्या परिषदेने घेतला आहे. कुलगुरूंद्वारे गठित समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए.बी. मराठे यांनी तसा अहवाल सादर केला असता, तो मान्य करण्यात आला आहे.

विद्या परिषदेच्या सदस्य अरुणा पाटील यांनी १५ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या विद्या परिषदेपुढे विषय क्रमांक ४९(४) अन्वये संलग्न महाविद्यालयांत पदव्युत्तर प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होण्याबाबत विषय मांडला होता. त्यानंतर एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम. या अभ्यासक्रमांचे प्रवेश विद्यापीठाच्या धर्तीवर महाविद्यालयात करता येईल का, यासाठी प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या अध्यक्षतेत नियुक्त

समितीने पुस्तकरूपात अहवाल सादर केला. याविषयी विद्या परिषदेने विचारविनिमय करुन

अहवालात सदस्यांना काही व्यावहारिक सूचना करण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला. या अहवालानुसार संलग्न महाविद्यालयांसोबत विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे

पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याबाबत केलेल्या शिफारशींना विद्या परिषदेने ४ डिसेंबर २०२० रोजी सुधारणांसह पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मान्यता प्रदान करण्यात केली आहे. शैक्षणिक सत्र २०२१- २०२० पासून प्रवेशप्रक्रिया सुरू करावी, असे विद्या परिषदेने निर्णयात स्पष्ट केले आहे.

Now Postgraduate Admission – एकाच खिडकीवरुन मिळेल ‘पीजी’प्रवेश

एम.ए. एम.एस्सी, एम. कॉम या अभ्यासक्रमांचे आता एकाच खिडकीवरुन मिळेल. विद्यापीठ,

महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्रवेश अर्ज भरण्याची गरज राहणार नाही. पाचही जिल्ह्यातील पदवी विद्यार्थ्यांना पीजी प्रवेश, विषय सहजतेने लक्षात येईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून पारददर्शकता राहिल, असे समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए.बी. मराठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.