Take a fresh look at your lifestyle.

नवीन अपडेट – MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी!

0 145

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी! कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, 2021 मध्ये होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.

 

Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.