विविध जिल्ह्यात भारतीय लष्करात भरती रॅली आयोजित
Indian Army Rally 2020 Schedule
Indian Army Rally 2021 Maharashtra – मित्रांनो, प्राप्त बातमी नुसार भारतीय लष्कर पुन्हा एकदा तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी देत आहे. सैन्याने अनेक वेगवेगळ्या जागांवर नोकर भरती केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशा 8 जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची सैन्यभरती 5 ते 25 मार्चदरम्यान होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणारी भरती सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज बैठकीत दिली.
कर्नल श्री. पाल यांनी यावेळी माहिती दिली. मार्चमध्ये होणाऱ्या भरतीसाठी नोंदणी झालेल्या परंतु, प्रवेश पत्र मिळालल्या उमेदवारांनाच भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्याने त्याबाबत भरती प्रक्रियेचे नियोजन करावे लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (पोस्ट्सनुसार)
- सैनिक जनरल ड्युटी – दहावी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे)
- सैनिक तांत्रिक – विज्ञान (पीसीएम) ते १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
- सैनिक नर्सिंग सहाय्यक – विज्ञान (पीसीबी) ते १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
- सैनिक लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल – कोणत्याही शाखेतील १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
- शिपाई – १२ वी पास आणि फार्मामध्ये डिप्लोमा (वयोमर्यादा – १९ ते २५ वर्षे)
- सैनिक ट्रेड्समन – दहावी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
- सैनिक ट्रेड्समन – आठवी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
- निवड प्रक्रिया – सैन्यात भरतीसाठी उमेदवारांची निवड वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. पुढील सूचनेवरून सविस्तर माहिती घेता येईल.