Take a fresh look at your lifestyle.

HSC परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून (3 एप्रिल) ऑनलाइन उपलब्ध होणार

0 68

HSC Exam Admit Card : HSC परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून (3 एप्रिल) ऑनलाइन उपलब्ध – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी (HSC Exam 2021) विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाइन पद्धतीने (Online) देण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. बारावी परीक्षांचे हॉलतिकीट 3 एप्रिलपासून कॉलेजांना ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाइन प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना प्रिंट करून द्यायची आहेत. बारावीची अंतिम परीक्षा एप्रिल – मे २०२१ मध्ये होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी www.mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून कॉलेजच्या लॉगइनद्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करावेत