Take a fresh look at your lifestyle.

दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइनच; बोर्डाचे स्पष्टीकरण

SSC HSC Exams 2021

1 524

SSC HSC Exams 2021 : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाउन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. यामुळे परीक्षा ऑफलाइनच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये ‘नाइट कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांवरही करोनाचे पुन्हा सावट आले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ट्विटर मार्फत करण्यात येत आहे.

वाढत्या करोनामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यास आमच्या मुलांचा जीव धोक्यात घातला जाऊ शकतो. अनेक शाळांमध्ये व परीक्षा केंद्रावर पुरेशा सुरक्षा व्यवस्था नाही त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमच्या मुलांच्या जिवाची काळजी घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. तर काही विद्यार्थी व पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ट्विटरवरून केली आहे.

Join WhatsApp Group
1
Join WhatsApp Group
महाभरती जॉब पोर्टल
Hello
आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 8121570123 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन जाहिराती पाठवू शकतो.
Join WhatsApp Group वर क्लिक करा.